Breaking
महाराष्ट्र

बाबा डमळे पाटील यांच्या मार्फत मोफत शस्त्रक्रिया उपक्रम हा स्तुत्य – डॉ.भागवत

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

 येवला दि.२४ जानेवारी (प्रतिनिधी) पुष्पा पाटील

गेल्या दहा वर्षापासून येवला – लासलगाव मतदार संघात जनतेला मोफत नेत्र शस्त्रक्रिया म्हणजेच दूरदृष्टी देणारा नेता म्हणजे बाबा डमाळे पाटील यांचा उपक्रम खूप चांगला व स्तुत्य आहे आहे असे प्रतिपादन अंदरसुल येथील जुने अनुभवी ज्येष्ठ डॉ. सुधाकर भागवत यांनी केले. 

     गेल्या दहा वर्षापासून 70 हजार जनतेचे मोफत तपासणी व सुमारे 6500 रुग्णांची पुणे येथे नेऊन कोणताही खर्च न घेता मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.ही सेवा अविरत चालू आहे.

या वर्षातील मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराची पहिली बस 40 रुग्णांची पाठवण्यात आली होती त्यापैकी 37 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांचे स्वागत रस्ते सुरेगाव येथे डॉक्टर तुषार भागवत,डॉक्टर महेश मोरे,विकास संस्था चेअरमन बारकू मगर,सरपंच भाऊराव आहेर,ज्ञानेश्वर तुपे,वाल्मिकराव काळे, राजेंद्र पगारे,देविदास चव्हाण,साईनाथ उचित,ज्ञानेश्वर आवटे लक्ष्मण कुऱ्हे,दत्तू वाघ यांच्या हस्ते यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना भारत मातेची प्रतिमा प्रदान करण्यात आली.

दुसरी बस डॉक्टर सुधाकर भागवत यांच्या हॉस्पिटल मधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाठवण्यात आली.सर्व रुग्णांचे स्वागत व विचारपूस बाबा डमाळे पाटील यांनी करून सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद व दर्शन घेतले.

सर्वच नेत्र शस्त्रक्रिया ही मोफत करून सर्व सुविधा उपलब्ध केल्याबद्दल केल्याबद्दल रुग्णांनी बाबा डमाळे पाटील,माजी लोकनियुक्त सरपंच सौ वंदना डमाळे पाटील,युवक कार्यकर्ते रोहन डमाळे,भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष वृषाल डमाळे पाटील,डॉ.राजूखान सय्यद, डॉक्टर तेजस ठोंबरे व सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे