Breaking
आरोग्य व शिक्षण

लासलगाव मराठी उर्दू शाळा अंगणवाडी केंद्र क्रमांक 150 येथे शैक्षणिक साहित्य वाटप

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि १८ जून विशेष प्रतिनिधी निशिकांत पानसरे 

 नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे वातिने अध्यक्षा फरीदा अनिस काजी यांच्या वाढदिवसा निमित्त अंगणवाडी मुलांना दप्तर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

 आज मराठी उर्दू शाळा अंगणवाडी केंद्र क्रमांक 150 येथे लहान चिमुकल्यांना पाणी बॉटल दप्तर टिफिन डबा शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप करण्यात आले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार संमेती चे मा.सभापती लासलगाव ग्रामपंचायत चे मा.सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते श्री जयदत्तजी होळकर यांनी मुलांना मार्गदर्शन करत फरीदा काजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुले देवाघरची फुले संभोदित करून एकोप्याचे सुंदर संदेश दिले.

ह्या वेळेस माझी सरपंच अफजल शेख महिला दक्षता समिती अध्यक्षा सौ वेदिका ताई होळकर काँग्रेसचे प्रतिष्ठित नेते गुनाभाऊ होळकर ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ पाटील केंद्रप्रमुख बदाने साहेब युनूस भाई तांबोळी ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव नजीक लतीफ भाई तांबोळी मिरान पठाण शेजाद पठाण अर्षद शेख अंगणवाडी शिक्षिका वंदना वाढवणे मदतनीस कविता चव्हाण झेडपी मराठी शाळा शिक्षिका देशमुख मॅडम माया होळकर पद्मा वाघ लतिफा ताबोली संगीता झांबरे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन zp उर्दू शाळेचे मुख्याध्यापक साजिद सर यांनी केले आभार प्रदर्शन देशमुख मॅडम यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे