न्यायभूमी न्यूज
विचूर दि ०४ सप्टेंबर सुनील क्षीरसागर
लासलगाव पोलिसांनी गांजाच्या अवैध तस्करीवर मोठा धडक बसवला असून तब्बल ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना अशी :दि.२ सप्टेंबर रोजी रात्री ११.४७ वाजता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भरवस फाटा येथे कारवाई करण्यात आली. MH 04 EN 8811 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार अडवून तपासणी केली असता कारमधून ९८५ ग्रॅम गांजा (किंमत ₹५,०००) तसेच मोबाईल हँडसेट,रोख रक्कम आदींसह एकूण ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी :या प्रकरणी सलीम कामूद्दीन पिंजारी व राजू हाजी अहमद पिंजारी दोघेही रा.पिंपळगाव बसवंत जि.(नाशिक) यांच्यावर भादंवि कलम २८१, १२५(अ),१२५(ब),३२४(४), १३४, १७७ तसेच एन.डी.पी.एस.कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

जप्त मुद्देमाल :स्विफ्ट डिझायर कार (MH 04 EN 8811)दोन मोबाईल हँडसेट रोख रक्कम व
९८५ ग्रॅम गांजा एकूण किंमत : ₹२,१०,००० अशी असून या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा तस्करीला आळा बसण्याची शक्यता असून लासलगाव पोलिसांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.