Breaking
महाराष्ट्र

विंचूर भवानी पेठेत जगदंबा माता अष्टदशभूजा देवी मंदिरात भक्तांचा उत्साह

न्यायभूमी न्यूज संपादकिय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

विंचूर (नाशिक) दि.२७ सप्टेंबर सुनील क्षिरसागर

 विंचूर शहरातील भवानी पेठ येथे जगदंबा माता अष्टदशभूजा देवी मंदिराची प्रतिष्ठापना मागील वर्षी ढवण परिवार,आतेष्ट मंडळी तसेच विंचूर ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्यातून करण्यात आली होती.

या धार्मिक उपक्रमाने गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले असून, यंदाच्या वर्षी देवी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

दररोज सकाळपासूनच मंदिर परिसरात पूजा, आरती,अभिषेक तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचा सुरू असलेले भक्तीमय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भाविक उत्साहाने सहभागी होत आहेत.

मंदिर परिसर दिव्य रोषणाई, सजावट आणि देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

विशेष म्हणजे,प्रतिष्ठापनेला अवघ्या एक वर्ष पूर्ण होत असतानाच या देवीस्थानाने भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्रस्थान मिळवले आहे.परिसरात दिवसरात्र भाविकांच्या ओढीने मंदियाळी फुलली आहे.

महिला मंडळ, युवक मंडळ तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम, भजन-कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.

ढवण परिवार आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे उभारलेले हे मंदिर विंचूर शहरासाठी श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे.

भाविकांच्या उपस्थितीमुळे भवानी पेठ परिसरात उत्सवमूढ वातावरण असून,या देवीमंदिराची कीर्ती आता दूरदूर पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे