निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील आराध्या इलेक्ट्रिकल्स दुकान चार चोरट्यांनी फोडले चोर सीसीटीव्ही मध्ये कैद
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २५ में अभय पाटील
निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील पंकज बनकर यांचे दुकान आराध्या इलेक्ट्रिकल्स रात्री एकच्या सुमारास दुकानाचे चार चोरट्यांनी शटर तोडून 2 चोरटे आतमध्ये प्रवेश केला.
स्पीकर काही इलेक्ट्रिकल्स पार्ट अंदाजे 80 हजार ते 1लाख चा मुद्देमाल 2500 हजार रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.
त्यानंतर तिने मोर्चा वळवला कैलास रंगनाथ डुंबरे यांच्या घराकडे तेथून CT 100 गाडी नंबर MH 15 EF 5358 ही गाडी चोरट्यांनी पळवली.
काही वेळाने तेथून दोन युवक जात असताना त्यांना दुकानाचे शटर तुटण्याचे समजले व त्यांनी बनकर यांना ही माहिती दिली व तेथे आले असता त्यांनी हा प्रकार सगळा बघितला.
त्यानंतर त्यांनी लासलगाव पोलीस ठाणे यांना रात्री 2 वाजता माहिती दिली.
पोलीस प्रशासन तात्काळ येथे पोहोचले काही दिवसापासून विष्णुनगर,विंचुर,लासलगाव परिसरात घरफोडया होत आहे.
परंतु कुठल्याही चोरट्यांचा अजून तरी शोध लागलेला नाही.
आराध्या इलेक्ट्रिकल्स दुकान फोडताना हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

पोलीस सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ नाईकवाडे व किशोर लासुरकर तपास करीत आहेत.