Breaking
कृषीवार्ता

आत्मा अंतर्गत मोह येथे शेती शाळा संपन्न !!!

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि १० जुलै 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सोयाबीन पिकावर 3 जून रोजी मौजे मोह येथे शेती शाळा घेण्यात आली.

यासाठी सिन्नर तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री गोकुळ जाधव तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री.भदाणे मॅडम यांनी खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

बियाण्यांची योग्य निवड करणे अपेक्षित आहे तसेच फुले दूर्वा व फुले संगम वाणा बाबत माहिती देण्यात आली.

100 ते 105 दिवसांचे वाण असून 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादकता घेता येते.

बियाणं घरच असो वा विकतच उगवण चाचणी करायची क्षमता 70 टक्के किंवा जास्त असल्यास बियाणे उत्तम प्रतीचे आहे असे समजावे.बीज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले असता जैविक निविष्ठा लिक्विड कॉन्सरशिया,ट्रायकोडर्मा व्हिरिडी बिव्हिरिया, मेटारायझियम,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रात्यक्षिक साठी किट उपलब्ध करून देण्यात आले. जैविक बी प्रक्रिया कशी करावी यावर खालील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. बियाणे पसरून घ्यावे, लिक्विड कॉन्सरशिया बियाण्यास लावून किंवा शिंपडून घ्यावे.

 बियाणे चांगले घुसळून घ्यावे बियाणे चोळायचे नाही बियाणे सावलीत सुकवून घेऊन चार तासाच्या आत पेरणी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लिक्वीड कॉन्सर्शिया मधील जिवाणू कशी मदत करतात त्याबाबत मार्गदर्शन करताना एनपीके जिवाणू भुसाधारक म्हणून काम करतात व नत्र स्फुरद पालाश विरघळणारे जिवाणू जमिनीत असलेले नत्र स्फुरद पालाश पीकास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.

हवेमध्ये 78% नत्र असून सुद्धा अमोनिकल फॉर्म मधील नत्र नायट्रेट फॉर्ममध्ये पिकास उपलब्ध होण्यासाठी रायझोबियम एझोटोबॅक्टर मधील जिवाणू मदत करतात.

तसेच पीएसबी म्हणजेच फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीतील असलेले एक्सेस फॉस्फेट उपलब्ध करून देण्यास मदत करतात आणि त्याचप्रमाणे केएमबी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीत असलेले पोटॅश उपलब्ध जिवाणू करून देतात.

यावरून स्पष्ट स्वरूपात असं सर्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की वाढता उत्पादन खर्च रासायनिक खतावरील खर्च व आपल्या जमिनीत असलेले भरपूर वर्षापासून उपलब्ध असलेल्या नत्र स्फुरद पालाश जिवाणूंच्या मार्फत उपलब्ध करून देण्यासाठी जैविक बीज प्रक्रिया व जैविक निविष्ठांचा वापर करणे खूप गरजेचे आहे.

सदर शेती शाळेच्या दरम्यान गटाचे शेतकरी सदस्य व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे