Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यातील विंचूरला दुकानादाराचे दुकाना पुढे वस्तूचे अतिक्रमण;गुन्हा दाखल..

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

विंचूर (नाशिक) : दि २५ जून सुनील क्षिरसागर 

विंचूर येथील रहदारी असलेल्या रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमण बाबत वेळोवेळी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पथक काढून कडक सूचना देण्यात आल्या परंतु मारवाडी पेठ,तसेच बाजार गल्ली,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयालगत रोड,ग्रामपालिके जवळ व श्रीराम चौक या रस्त्यावरील मोटरसायकलचे व चारचाकी च्या अतिक्रमणात कायम वाढतच आहे

.

दि.२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मारवाडी पेठ येथील भोलेहर जनरल स्टोअरचे दुकानासमोर,रस्त्यावर जनरल स्टोअरच्या दुकानाबाहेर रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने अडकवलेल्या स्कूल बॅग व रस्त्यावर ठेवलेले दुकानातील विक्रीचे साहित्य लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दुकानात घेण्यास सांगितले असता,आरोपी १) शंकरलाल मिस्त्रीलाल सोनी,२) दिलीप मिस्त्रीलाल सोनी, ३) भाग्येश दिलीप सोनी,४) जयेश बाबुलाल सोनी यांनी संगणमत करून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडा ओरडा करून पोलीस पथकावर अवाश्च भाषेचा वापर करून लोकांची गर्दी जमवून दुकानाबाहेर रहदारीचा अडथळा होईल.

अशा पद्धतीने अडकवलेल्या स्कूल बॅगा काढून घेण्यास नकार देऊन,पोलिसांचे कायदेशीर आदेशाचे पालन करण्या स्पष्टपणे नकार देऊन अवज्ञा केली.

म्हणून लासलगाव पोलीस ठाणे येथे गुरनं- १५७/२०२५ भा.न्या.सं.कलम २२१, २२३,२८५ सह मु.पो.का.कलम १०२,११२,११७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांदळकर करीत आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे