विंचूर’पहेलगाम’येथील हल्ल्याचा निषेध;विंचूर कडकडीत बंद
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २७ एप्रिल न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर,विंचूर प्रतिनिधी राहुल गलांडे
_जम्मु-काश्मीर मधील ‘पहेलगाम’ येथे २२ एप्रिल, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत.
अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेच्या निषेधार्थ विंचूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली.
_विंचूर गावातील बहुतांश दुकाने, कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या. तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली.
शाळा, कॉलेज, बाजारपेठा आणि वाहतूक सेवाही प्रभावित झाली._
_सकाळपासूनच विंचूर मध्ये अनेक दुकाने, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विंचूर मधील नागरिकांनी या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे._
_केंद्र सरकारने कठोर पावले उचलून अतिरेक्यांना कंठस्नान घालावे हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनांच्या अतिरेक्यांना कठोरातील -कठोर शासन करावे.
यावेळी विंचूर,विष्णुनगर,हनुमान नगर, कृष्ण वाडी, सुभाषनगर या ग्रामस्थांनी मागणी केली आहे._



