न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १० मार्च सोमनाथ गिरी तालुका प्रतिनिधी

दि.8/3/2025 रोजी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांचे वतीने पुणे क्षेत्रीय कार्यालय चे उप महाप्रबंधक श्री विनोद घाटे साहेब, क्षेत्रीय प्रबंधक श्री विनायक दीक्षित साहेब व जिल्हा प्रमुख श्री वैभव संत सर यांचे मार्गदर्शन खाली आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मौजे.पाठ पिंपरी, तालुका – सिन्नर जिल्हा- नाशिक येथे भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला.
त्यात महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीच्या वतीने छत्री वाटप करण्यात आले.
तसेच फसल विमा पाठशाळेचे आयोजन करून उपस्थित महिलांना पीक विमा योजने संदर्भात माहिती देण्यात आली.
तसेच ॲग्री स्टॅक रजिस्टर नोंदणी ,शेतकरी सन्मान निधी व महाऑनलाईन डीबीटी योजना संदर्भात माहिती देण्यात आली.
तसेच गावातील काही प्रतिष्ठित शेतकरी व काही महिलांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमांमध्ये गावांमधील काही विद्यार्थिनींची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली यात गायत्री नारायण उगले, दिपाली पंढरीनाथ उगले, गायत्री राधाकिसन एरंडे, आरती अहि लाजी उगले, सुजाता लहानुभाऊ कडलग, गायत्री अण्णा उगले, तसेच राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये साक्षी गोविंद ताकाटे, गायत्री प्रकाश उगले, पुनम ज्ञानेश्वर एरंडे, स्वाती अशोक एरंडे, प्रियंका नवनाथ उगले, श्रावणी अरुण उगले, स्नेहल सोमनाथ उगले, पल्लवी संदीप भुते, या विद्यार्थिनींची निवड झाली असून राज्यस्तरीय बांबू उडीमध्ये आदिती अण्णा उगले, वैष्णवी बंडू देशमुख, या दोन विद्यार्थिनींची निवड झाली.
गावातील तलाठी पदावर माधुरी बाळू उगले, या विद्यार्थिनीची निवड झाली.आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून वैशाली महेंद्र उगले यांचाही सत्कार करण्यात आला.
तसेच गावातील सुपुत्र करण संजय उगले यांची नुकतीच सीबीआय/ए आय आर या पदी निवड झाली या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक शोभिवंत वृक्ष देऊन या कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक रणजीत आंधळे साहेब, तसेच कृषी सहायक मेघा पेढेकर मॅडम, तसेच ग्रामसेवक प्रीतम पगारे मॅडम, सिन्नर तालुका पीक विमा प्रतिनिधी श्री. सुयोग वाजे, किरण मटाले, गौरव शेवाळे, ग्रामपंचायत सरपंच नंदा गायकवाड, उपसरपंच योगिता सातपुते, महिला सदस्य निर्मला बर्डे, सदस्य सुरेश हिंगे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ग्रा. कर्मचारी देविदास गायकवाड, तसेच कोतवाल रामाभाऊ भालेराव, कर्मचारी अण्णा उगले, राम नलवाडे यांनी परिश्रम घेतले.



