विविध सांस्कृतिक उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन जनता कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
तुमसर ( भंडारा ) दि.०१ मार्च

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बॅकवर्ड क्लासेस शैक्षणिक व सांस्कृतिक सुधारणा मंडळ तुमसर चे जनता कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गीत,कविता व माहितीपर सादरीकरण करून मराठी भाषेप्रती आपला अभिमान व्यक्त केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज बोरकर यांनी विद्यार्थ्यांना कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात मराठी विषयाचे प्रा. पंकज मढवई यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्य, त्यांचे बालपण,शिक्षण,साहित्यसंपदा स्वातंत्र्य संग्रामात केलेले कार्य,मराठी साहित्याला उंचीवर नेण्यासाठी केलेले प्रयत्न,त्यांची यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये इयत्ता अकरावी कला व वाणिज्य विभागातील आचल सोनवणे,सृष्टी रहांगडाले,वेदांती शहारे,राजेश्वरी राऊत व आयुषी जांगडे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.मोहन भोयर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रा.आशिष खोब्रागडे,प्रा. नितीन पाटील, प्रा.सविता डोंगरवार तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव व कुसुमाग्रजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.


