Breaking
महाराष्ट्र

भक्तिरसात दुमदुमली एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल;दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

1 1 0 1 5 3

न्यायभूमी

बाभुळगाव, दि.२५ जुलै प्रतिनिधी पुष्पा पाटील

एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,बाभुळगाव येथे आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त शाळेतून भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा गजर,भगवे ध्वज आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पारंपरिक वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.दिंडी शाळेपासून मंदिरापर्यंत नेण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राम कृष्ण हरी च्या गजरात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवरील नृत्य,अभंग गायन,हरिपाठ,भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा,संतांचे विचार,भक्ती,शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक मा. श्री.कुणाल दराडे यांनी केले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.निलेश शिंदे,उपमुख्याध्यापक श्री.संदीप पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ह.भ.प.वैभव महाराज,गांगुर्डे मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे