Breaking
महाराष्ट्र

महावितरण तर्फे गुरुवारी लासलगाव उपविभाग येथे निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 1 5 4 1

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि ०३ जून 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात 01 ते 06 जून 2025 दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून लासलगाव उपविभागा अंतर्गत लासलगाव उपविभाग महावितरण व कर्मवीर भाऊराव पाटील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक 5 जून 2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता निफाड तालुक्यातील शालेय विद्यार्थी व महावितरण कर्मचारी पाल्यांसाठी विद्युत सुरक्षितता या विषयावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य विद्युत अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे या स्पर्धेचे ब्रीद आहे. सदर स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर तालुका निफाड,येथे होणार असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना विविध बक्षीसे व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात येणार आहे.

निफाड तालुक्यातील पहिली ते दहावी इयत्तेतील जास्त जास्त विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यकारी अभियंता श्री.केशव काळुमाळी व प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री किरण काकड साहेब यांनी केले आहे.

सदर स्पर्धेसाठी आयोजकांकडून ड्रॉइंग पेपर व अखीव पेपर पुरविण्यात येईल.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे