घोटी केंद्रावरील एस.एस.सी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
सिन्नर दि.१६ फेब्रुवारी सोमनाथ गिरी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय घोटी या केंद्राची एस.एस.सी.परीक्षेसाठीची केंद्र आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
जनता विद्यालय घोटी.केंद्र क्रमांक १२१५ असून दि.२० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३८५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. जनता विद्यालयात बैठक क्रमांक – डी शून्य ३९२९२ ते डी शून्य ३९६७६ पर्यंत अशी एकूण ३८५ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सर्व विषयासाठी करण्यात आली आहे.
या केंद्रात जनता विद्यालय घोटी , मुंढेगाव तसेच नित्यानंद इंग्लिश मेडिअम स्कुल घोटी या शाळा समाविष्ट आहे.
अशी माहिती जनता विद्यालय व उच्च माध्यमिक घोटीचे पर्यवेक्षक व केंद्रसंचालक हिरामण चौधरी यांनी दिली आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी १० वाजता
परीक्षा केंद्रात हजर रहावे.सोबत फक्त लेखन साहित्य व पाणी बॉटल आणावे.परीक्षा केंद्रात कोणीही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच आणू नये.
दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटीचे प्राचार्य नितीन भामरे,उपमुख्याध्यापक उल्हास पवार,केंद्र संचालक हिरामण चौधरी,उपकेंद्रसंचालक नामदेव सरगर,मुख्य लिपिक भाऊसाहेब रणशेवरे,वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे,अनिल गोवर्धने,वैशाली विधाते,संपत शेंगाळ यांनी केले आहे.


