विद्यार्थ्यांना चांगले व उच्च शिक्षण मिळावे यासाठी मविप्र संस्था नेहमी कटिबद्ध:- उपाध्यक्ष विश्वासराव मोरे
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
सिन्नर दि.०७ ऑक्टोंबर वार्ताहर सोमनाथ गिरी
जीवनात आरोग्य फार महत्त्वाचे आहे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी सेवन करणे गरजेचे आहे.पाण्याचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.
शुद्ध पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी केले.
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वॉटर प्युरिफायर उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
श्री.मोरे पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांना चांगले व उच्च शिक्षण मिळावे यासाठी मविप्र संस्था नेहमी कटिबद्ध असते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजे.
मविप्र संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
व्यासपीठावर मविप्र संस्थेचे दिंडोरी तालुका संचालक प्रवीण नाना जाधव,गोदावरी आणि लक्ष्मी वैद्य फाउंडेशन मुंबई ऑस्टेनीटिक द्राक्षतार परिवाराचे एरिया डेव्हलपमेंट मॅनेजर विकास दवंगे,योगेश दवंगे,लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष बबनराव वाजे,सिन्नर उड्डाण फाउंडेशनचे दत्तात्रय गोजरे,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने,सरपंच रामनाथ पावसे,शंकरराव वामने,माजी सरपंच शरद माळी ,अर्जुन वाजे,अशोकराव गवळी, काशिनाथ वाजे,विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वॉटर प्युरीफायरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना संचालक प्रवीण जाधव म्हणाले की पाणीही आरोग्याची व यशाची गुरुकिल्ली आहे विद्यार्थ्यांनी चांगला आरोग्यासाठी पाण्याची जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे.
जीवनात कष्टाचे महत्त्व खूप आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे कष्ट घेतल्यास यश हमखास मिळणार आहे असे ते म्हणाले.

गोदावरी आणि लक्ष्मी वैद्य फाउंडेशन मुंबई या संस्थेचे वतीने दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे वॉटर प्युरिफायर तसेच उड्डाण फाउंडेशनचे दत्तात्रय गोजरे यांनी आपली आई सत्यभामा सदाशिव गोजरे स्मरणार्थ पाच हजार रुपये किंमतीची पाण्याची टाकी दिली.
विद्यालयाच्या वतीने स्वागतगीत सादर करण्यात आले. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने वाचनीय पुस्तक,शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी तर आभार पर्यवेक्षिका जयश्री पगारे यांनी मानले.
यावेळी शालेय समितीचे सदस्य भाऊपाटील वारुंगसे,रामकृष्ण वाजे समीर सय्यद,सुनील ससाणे,पोलीस पाटील रामदास वारुंगसे,उडान फाउंडेशन संस्थेचे बाळासाहेब शिंदे,गणेश तांबोळी,शंकर शेलारआदींसह शालेय समितीचे सदस्य सभासद पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.


