Breaking
ब्रेकिंग

महावितरणच्या वायरमनकडून ₹१५ हजारांची लाच मागणी; ₹५ हजार स्वीकारताना खासगी इसम ताब्यात,वायरमन फरार

न्यायभूमी वार शुक्रवार,२५ सप्टेंबर २०२६

1 3 1 7 5 1

न्यायभूमी

पिंपळगाव (ब.), नाशिक : शेतातील वीजमीटर दुरुस्ती तसेच संबंधित वीजकामात अडथळा आणण्याची धमकी देत लाचेची मागणी केल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

या कारवाईत ₹५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला ताब्यात घेण्यात आले, तर महावितरणचा वायरमन जितेंद्र ठाकूर फरार झाला आहे.

तक्रारदार यांची वडाळीभोई, ता. चांदवड येथे शेतजमीन असून, शेतातील ट्रान्सफॉर्मरमधून वायरद्वारे वीज घेऊन ते शेती व्यवसाय करीत होते. या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ लोकसेवक जितेंद्र ठाकूर, वायरमन, महावितरण विभाग, वडाळीभोई, ता. चांदवड, वर्ग-३, याने तक्रारदाराविरुद्ध कारवाई करण्याची भीती दाखवत ₹१५ हजारांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदाराने भीतीपोटी आरोपी क्रमांक १ याला ₹१० हजार दिले होते.

त्यानंतर उर्वरित ₹५ हजार देण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. तक्रारदाराच्या भावाने आरोपीला निरोप दिल्यानंतरही उर्वरित रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.
यानंतर तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

२३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १३.४३ ते १४.०० वाजेदरम्यान तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
२४ सप्टेंबर २०२६ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडील उर्वरित ₹५ हजारांची लाच आरोपी क्रमांक २ कृष्णा काशिनाथ ढोमसे (वय ३०), व्यवसाय मेडिकल शॉप, रा. गोरठाण, शिरवाडे वणी, ता. निफाड, जि. नाशिक, याच्यामार्फत स्वीकारण्याचे ठरले होते.

लाचेची रक्कम स्वीकारत असताना सापळा पथकाची चाहूल लागताच आरोपी क्रमांक १ जितेंद्र ठाकूर हा घटनास्थळावरून फरार झाला, तर आरोपी क्रमांक २ कृष्णा ढोमसे याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.

या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

कारवाईतील अधिकारी
सापळा अधिकारी : श्री. अजय सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.
सापळा पथक : सहा. पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशिकर, प्रमोद चव्हाणके, योगेश साळवे.
तपास अधिकारी : श्रीमती सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 7 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे