लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघात महावितरण कपनीचे लाईनमन गंभीर जखमी
पुन्हा एकदा वाहतूक कोंडी प्रश्न ऐरणीवर
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) दि.१४ ऑगस्ट सुनील क्षिरसागर
महावितरण कंपनीचे लासलगाव कार्यालयातील लाईनमन विज (लाईट) संदर्भातील काम करून कार्यालयात येत असताना,लासलगाव येथील कोटमगाव – विंचूर त्रिफूलीवर दुधाच्या टँकर ने मोटरसायकल नंबर MH 15 DA 0458 ला पाठीमागून धडक दिल्याने,एक जण गंभीरपणे जखमी झाले आहेत.

त्यांच्या पायाचा चांगलाच चेदामेदा झालेला आहेत.त्यांना तात्काळ लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.पण मार जास्त प्रमाणात असल्यामुळे मोटरसायकल स्वाराला ॲम्बुलन्सने नाशिक येथे केम्स मानवता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
लासलगांव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालयातील किरण देवरे वय ( ४२ ) व समाधान साठे दोघे ही विंचूर रोड येथील ॲक्सिस बँक जवळ डीपीवर काम करून कार्यालयात येत असताना हा अपघात झाला.

——————————
पुन्हा एकदा वाहतूक कोंडी प्रश्न ऐरणीवर ….
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असताना कायम मोठ्या प्रमाणात रस्त्या अभावी मोठी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
लासलगाव बाजार समितीचा मोठ्या प्रमाणात कांदा तसेच इतर शेतीमालाची आवक याच विंचूर रोडवरील ते रेल्वे गेट उघडले नंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
कोटमगाव – विंचूर रोड लगत त्रिफुलीवर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे खूप गरजेचे झाले आहे.
शहरातील मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण व चौपदरीकरण मंजूर झाले असून कामाला सुरुवात होईना.
मात्र वर्दळीचे ठिकाण रेल्वे स्टेशन रोड ते विंचूर रोड वरील रिक्षा स्टॅन्ड पर्यंत असलेल्या रस्त्यांची पूर्ण दुरावस्था झालेली आहे.हे खड्डे चुकवताना अनेक वाहनांनचे अपघाताचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे.
————————-
या रस्त्याचे काम बाहेरच्या परिसरात सुरू झाले आहे.
मग लासलगाव परिसरातील काम कधी होणारं आहे.
अशी नागरिकांची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
सदर टँकरची पुढील बाजू निळ्या सफेद रगाचा अशोक लेलंन कपनीचा असून १६ टायर चा दूध वाहतूक करणारा टँकर असून,त्याचा नंबर GJ 18 BV 1260 गाडी चालक विनोद देविदास पानपाटील वय (५२) याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसानी टँकर ताब्यात घेऊन,पूढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत.