विंचूर सह नाशिक जिल्हा शिंपी समाजाकडून गनबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अत्यंत दुर्दैवी दुःखद घटना
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : दि २३ एप्रिल सुनील क्षीरसागर
पुणे येथील रास्ता पेठ,श्री संत नामदेव शिंपी समाज मंडळाचे सदस्य, दानशूर व्यक्तीमत्व, गटृमा फरसाण चे मालक कै. कौस्तुभ गनबोटे हे ‘पहलगाम’ येथे इस्लामिक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडले.
गानबोटे परिवाराच्या दुःखात महाराष्ट्रातील विंचूर सह नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण शिंपी समाज सहभागी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्मास चिर शांती देवो हीच श्री संत नामदेव चरणी प्रार्थना व्यक्त केली आहे.
घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी रास्ता पेठ, समस्त नामदेव शिंपी समाज मंडळ, मारुती मंदिर येथे आज सायंकाळी ७.०० वा. सर्व समाज बांधवांनी एकत्रित जमावे व त्यानंतर रास्ता पेठ, पुणे येथील लकेरी मारुती चौकात असलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या “गटृमा फरसाण” या दुकाना पर्यंत कॅण्डल मार्च निघणार आहे.
असे सर्व समाज बांधवांना अवाहन करण्यात आले आहे. झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
यांच्या दुःखात विंचूर नाशिक जिल्हासह पुणे येथील नामदेव समाजोन्नती परिषद,ना.स.प. शाखा पुणे जिल्हा, ना.स.प. शाखा पुणे शहर
ना.स.प. शाखा पिंपरी- चिंचवड शहर, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्ञाती संस्था व संपूर्ण समाज बांधव सहभागी आहे.



