Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.दत्तात्रय पोपट क्षीरसागर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून यंत्र अभियांत्रिकी मध्ये पीएचडी यशस्वीपणे पूर्ण

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

येवला दि १५ में पुष्पा पाटील 

एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.दत्तात्रय पोपट क्षीरसागर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून यंत्र अभियांत्रिकी मध्ये पीएचडी यशस्वीपणे पूर्ण केली.

प्रा. क्षीरसागर १० वर्षापासुन एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर व रजिस्ट्रार पदावर कार्यरत आहेत .

डॉ. दत्तात्रय. क्षीरसागर यांनी “AISI 1040 स्टीलच्या टर्निंग प्रक्रियेवर बायो-ल्युब्रिकंट्स आधारित हायब्रिड नॅनो फ्लुइडच्या प्रभावाचा लघुउच्चतम प्रमाणातील स्नेहन वापरून अभ्यास” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत यशस्वीपणे पीएच.डी. प्रबंध सादर केला आहे.

डॉ. दत्तात्रय क्षिरसागर यांनी आत्तापर्यंत ४ स्कोपस सूचीबद्ध जर्नल पेपर्स, १ प्रकाशित पेटंट व ४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केलेले शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

  त्यांच्या संशोधन प्रबंध डॉ एम ए वेंकटेश ( प्राचार्य अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर ) आणि डॉ व्ही डी वाघचौरे ( यंत्र विभागप्रमुख ,अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर ) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आहे. 

 

  संस्थेचे अध्यक्ष मा आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री रुपेश भाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे,प्राचार्य डॉ डी. एम यादव,सर्व विभागप्रमुख,व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

डॉ. दत्तात्रय. क्षीरसागर यांनी यांनी हे यश आई वडील, पीएचडी मार्गशिक्षक व सहकारी शिक्षक यांना समर्पित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे