एस.एन डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांची ची क्यु स्पायडर,पुणे मध्ये निवड
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
येवला दि.१५ ऑक्टोंबर पुष्पा पाटील
बाभूळगाव ता.येवला येथील एस एन डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला च्याअंतिम वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि व कॉम्पुटर इंजिनियरिंग च्या तीस विद्यार्थ्यांची ची क्यु स्पायडर,पुणे मध्ये निवड ची फोर्स मोटर्स, पुणे मध्ये निवड झाली.

सदर ड्राईव्ह मध्ये तीन राऊंड झाले.पात्रता चाचणी, व्यतिगत व टेक्निकल मुलाखत झाली.यावेळी एच.आर मॅनेजर तेजस्वीनी बोजा,आर चंदना यांनी मुलाखती घेतल्या.
त्याला वार्षिक ३ लाख २० हजार पॅकेज देण्यात आले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम यादव,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ पी.पी रोकडे,कॉप्युटर विभागप्रमुख डॉ.जी.आर बोंबले प्लेसमेंट अधिकारी प्रा संदीप कराळे यांनी अभिनंदन केले.सदर ड्राईव्ह साठी प्रा.प्रा डी.बी वैराळ,प्रा एस ए गाडे यांनी नियोजन केले
तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.नरेंद्रभाऊ दराडे,आमदार श्री. किशोरभाऊ दराडे,सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री.रुपेषभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

