लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस
न्यायभुमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
निफाड प्रतिनिधी दि.०३ फेब्रुवारी जनार्दन चव्हाण
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आला आहे.
खंडु संपत गव्हाणे (वय २८, आर.सी.एफ. फोर्स सिक्युरिटी गार्ड,शाखा अहमदनगर,सध्या रा.देवगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.
विलास निवृत्ती भालेराव (रा.पिप्री,ता.येवला), ममता किरण पगारे (रा.ब्रिजलाल नगर, कोपरगाव) आणि चांदणी मोहन कदम (रा.गांधीनगर,कोपरगाव) या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस “आम्ही तुझे लग्न चांदणी हिच्याशी लावून देतो” असे आमिष दाखवले.
त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.त्यानंतर आरोपींनी खोटी नोटरी तयार करून आरोपी चांदणी हिला फिर्यादीसोबत देवगाव येथे पाठवले व लग्न झाल्याचा बनाव केला.
मात्र, प्रत्यक्षात कोणतेही कायदेशीर लग्न न होता फिर्यादीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स.पो.नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.