विंचूर हादरलं!मारवाडी पेठेत प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद”
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) : दि.०६ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर

काल विंचूर येथील मारवाडी पेठेत भर गर्दीत घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने विंचूर हादरले आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साधारण साडेसहा वाजता पवनकुमार जाजु (व्यापारी) व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज संपूर्ण विंचूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामस्थांच्या व व्यापारी असोशियनच्या वतीने लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
या वेळी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सर्व पक्षीय मान्यवर,व्यापारी,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनाद्वारे नागरिकांनी या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
