Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूरच्या रयत संकुलात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि २८ डिसेंबर : दत्तात्रय दरेकर 

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संपूर्ण निफाड तालुक्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे विद्यार्थी शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर सहभागी झालेले आहेत.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध वैज्ञानिक उपकरणे, गणितीय उपकरणे, शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारक यांनी तयार केलेले विविध उपकरणे यांची मांडणी करण्यात आलेली आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक प्रशांत गायकवाड, त्याचप्रमाणे कैलास सोनवणे, जगदीश जेऊघाले,राजाभाऊ गोरे, संजय खैरे, विंचूर ग्रामपंचायतचे सरपंच सचिन दरेकर, आत्माराम दरेकर, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर गाडे, किशोर दरेकर, स्नेहल साळी, प्रियंका सोनवणे, सुमन दरेकर, सोनाली कापडणीस, सुनिता शिंदे, मिरा दरेकर, सोमनाथ निकम, सतीश शेलार, संजय शेवाळे, दीपक घायाळ, नीलिमा शिरसाठ,आरती जाधव, केंद्रप्रमुख दिलीप कोथमिरे, सुधाकर जाधव, स्वाती धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी महेंद्र ग्रुप नांदी फाउंडेशन मार्फत मुलींसाठी राबवला जाणारा नन्ही कली प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील आडगाव, चांदोरी,जानोरी वनसगाव आणि विंचूर या शाखांमध्ये चालू करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांनी प्रोत्साहन दिले.

 वरील शाखांमध्ये प्रकल्प यशस्वीपणे सुरू होऊन या प्रकल्पांतर्गत 1500 मुलींसाठी फाउंडेशन मार्फत मोफत स्पोर्ट्स किट मिळवण्यात यश आले आहे.

सदर प्रकल्प चालू करण्यासाठी व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल, विंचूर गटातर्फे नन्ही कली प्रकल्प समन्वयक नाशिक जिल्हा यांनी भगीरथ शिंदे यांचा सत्कार केला. 

    सदर तालुकास्तरीय प्रदर्शन शुक्रवार दिनांक 27/12/2024 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत पाहण्यासाठी खुले असणार आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी व शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड यांनी यांनी केली आहे.

सदर प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 27 /12 /2024 रोजी दु. 3.00 वा. होणार असून, सदर कार्यक्रमासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सदस्य भास्कर भगरे आणि निफाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल कदम तसेच शिक्षक मतदार संघ नाशिक विभागाचे आमदार किशोर दराडे, पदवीधर मतदारसंघ नाशिक विभागाचे आमदार सत्यजित तांबे, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे