लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांचा उद्रेक अंगीं
दारूच्या नशेत ११२ नंबर डायल करून पोलिसांना वारंवार खोटी माहिती देणाऱ्या तळी रामावर गुन्हा दाखल
न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) : सुनील क्षिरसागर दि.६
लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांचा उद्रेक अंगीं आला.
कोणत्याही घटनेची तात्काळ पोलिसांना सूचना देण्यासाठी ११२ नंबर दिला आहे.मात्र हा नंबर सुद्धा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनाथ बाळू मोकळ राहणार नांदगाव ता.निफाड, जि.नाशिक येथील दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने ११२ नंबर वर वारंवार फोन करून,खोटे वृत्त दिले.
तातडीने घटनास्थळी पोहोचलेले पोलिसांना सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निदर्शनास आले.
तपासाअंती असे उघड झाले.त्यानंतर लासलगाव पोलिसांनी घटनेचा तपास करून सदर इसमाविरोधात सार्वजनिक यंत्रणेचा गैरवापर व खोटी माहिती देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकाराचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनास झाली सुरू आहे.