Breaking
गुन्हेगारी

नासिक येथे चारचाकी गाडीत आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने हातात तलवार, कोयता घेत घुडगुस घालुन गाड्यांची तोडफोड

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

 नाशिक :दि. २८ जानेवारी रोशन गव्हाणे

सिडको अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारचा दिवस हा कायद्याच्या बाले किल्ल्याला छेद करणारा ठरला. चारचाकी गाडीत आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने हातात तलवार,कोयता घेत घुडगुस घालुन गाड्यांची तोडफोड केली.

 त्रिमूर्ती चौकातील अवनी रेसिडेन्सी या ठिकाणी रात्री नऊ वाजता दरम्यान एक चार चाकी आली. त्या गाडीमध्ये अगदी फिल्मी स्टाईलने मागच्या मोकळ्या बाजूला दहा ते बारा जण झोपून इशाराची वाट बघत होते.

या टोळक्याला कुणालातरी लक्ष करायचे होते मात्र संबंधित व्यक्ती न भेटल्याने त्यांनी परिसरातील गाड्यांवर कोयत्याने वार करत परिसरात हैदोस घातला.यावेळी परिसरातील महिला व पुरुष घाबरून सैरावैरा पळू लागले.

 दरम्यान एक महिला घरात पळाली व त्या घरात जेवण करायला बसलेले कुटुंबीय देखील घाबरले मात्र त्याच दरम्यान गरम भाजीच्या पातेल्याला पाय लागल्यामुळे ते पातेले एका दोन वर्षीय मुलीच्या अंगावर उडाल्याने ती चिमुकली भाजली गेली. यानंतर सदरहू टोळक्याने या ठिकाणाहून निघत कामटवाडे गाव गाठले.

नवीन नाशिक मधील येथील कमल नगर, सावन रोहाऊस परिसरात रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास हातात धारदार शस्त्राने २ ते ३ गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

दरम्यान अंबड पोलिसांनी दोनही ठिकाणी पोहोचून पंचनामा केला असून संशय त्यांचा तपास सुरू,वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजपुत साहेब करित आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे