पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण विकास महामंडळाने केलेल्या आव्हानाला अभूतपूर्ण प्रतिसाद
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि ११ मार्च प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर
कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयामार्फत पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन दिनांक ०८ व ०९ मार्च २०२५ रोजी विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे करण्यात आले होते.

या पारंपारिक क्रीडा महाकुंभच्या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व अशासकीय आय.टी.आय.ने सहभागी व्हावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण विकास महामंडळाने केले होते.
त्यांच्या या आव्हानाला अभूतपूर्ण प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय पारंपारिक क्रीडा महाकुंभ विटी दांडू, फुगडी, लंगडी, रस्सीखेच,लेझीम, लगोरी,खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिन्टन, कॅरम, उंचउडी, लांबउडी,पंजा लढविणे, दंडबैठक, दोरीउड्या, पावनखिंड दौड, १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, बुद्धीबळ या खेळांचा समावेश होता.
पारंपारिक क्रीडा महाकुंभाचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रताप लोढा, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत पारंपारिक क्रीडा महाकुंभ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, सहसंचालक अनिल गावित, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, उपाध्यक्ष विश्वास सावंत नाशिक विभागाचे अध्यक्ष परशराम गंभिरे, उपाध्यक्ष शिवराज सोनवणे, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष तुषार डावखर व पुणे विभागाचे अध्यक्ष जाधव सर उपस्थित होते.



