Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथे जय बजरंग मंडळाची भव्य गणेश विसर्जन मिरवणूक..

0 8 9 9 9 4

न्यायभूमी विंचूर (नाशिक) दि ०८ सप्टेंबर

विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर

विंचूर येथील जय बजरंग मंडळ आयोजित गणेश विसर्जन मिरवणूक दि.५, विसर्जन दिवशी दुपारी ४ वाजता उत्साहात,पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाली.

मंडळाने आयोजित केलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून वातावरण मंत्रमुग्ध केले.

या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे माऊली दिंडी पथक सोहळा. तब्बल २०० हून अधिक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत व टाळ-चिपळ्यांच्या गजरात सहभागी झाले होते. संत परंपरेची ओळख करून देणारा हा सोहळा उपस्थितांना खऱ्या अर्थाने अध्यात्मिक अनुभूती देणारा ठरला.

त्याशिवाय संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भिंती चालविण्याचा व रेड्यामुखी वेद बोलविण्याचा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. हा प्रात्यक्षिक सोहळा पाहून लोकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली.

याशिवाय “श्री स्वामी समर्थ” महाराजांच्या लीलांचे सादरीकरण “आपले देवा महाराज परदेशी” आणि त्यांना साथ दिली “चोळापाच्या” भूमिकेत “आनंदा नागमोते” यांनी. त्यांच्या भावपूर्ण व उत्कट सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये श्रद्धेची भावना निर्माण झाली.

 

विविध सांस्कृतिक व धार्मिक देखावे, टाळ-मृदंग, लेझीम, हलगी यांच्या गजरात ही मिरवणूक भव्यतेने पार पडली. मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी आनंदाने सहभाग नोंदवला.

दरम्यान, माऊली दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी घराघरासमोर सडा-रांगोळ्या काढून स्वागत केले व मिरवणुकीला उत्साहाची भर घातली.

जय बजरंग मंडळाने केलेल्या उत्तम व्यवस्थापनामुळे ही विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध, पारंपरिक व सांस्कृतिक रंगात साजरी झाली.

या मिरवणुकीत सहभागी सर्व मंडळींनी “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात श्री गणेशाची विसर्जन यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पाडली..

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे