Breaking
आरोग्य व शिक्षण

विठ्ठलाचा नामाचा जयघोष करत भर पावसात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सटाणा दि ०६ जुलै विशेष प्रतिनिधी उत्तम गारे 

उत्तम शिक्षण,उत्तम संस्कार” या संस्थेच्या ब्रीडवाक्यप्रमाणे शहरातील दोधेश्वर पब्लिक स्कुलमध्ये सर्व सण उत्सव साजरा करून त्यांची महती आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालु आहे.

आषाढी एकादशी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते.त्याअनुषंगाने विद्यार्थी आणि शिक्षकांनी आज आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. 

सुरुवातीला संस्थेच्या सचिव श्रीमती मनोहरम्मा सुलू यांनी विठ्ठल रुख्मिणी यांच्या प्रतिमेची तसेच प्रि- प्रायमारीच्या विठ्ठल रुख्मिणी यांच्या वेषात आलेल्या विद्यार्थ्यांची मनोभावे पूजा केली.

यानंतर शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळे जवळच्या परिसरात दिंडीचे आयोजन करण्यात आले.

भर पावसात विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षीका यांनी पांडुरंगाचे नामस्मरण करत विठ्ठल रुक्मिणी सह वारकऱ्यांच्या वेशभूषेतील बालगोपाल टाळ,वाद्य आणि विठ्ठल गीतांच्या सुमधुर संगीताच्या वातावरणात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. 

परिसरातील जाधव परिवाराने यावेळी विठ्ठल रुक्मिणी यांची मनोभावे पूजा करून सर्व विद्यार्थ्यांना लाडूचा प्रसाद दिला.

वैशाली पगार,अर्चना पाटील,रोशनी पाटील,नेहा बागुल,माहेश्वरी कापडणीस यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे