राम मंदिरात आषाढी एकादशी उत्सव महापूजा,महाआरती आणि महाप्रसादाने गूंजला भक्तिभाव
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०७ जुलै विशेष प्रतिनिधी निशिकांत पानसरे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील राम मंदिरात पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या भक्तिमय सोहळ्यात भाविकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
उत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता श्री प्रशांत पाटील व त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा व अभिषेक करून झाली.त्यानंतर पारंपरिक काकड आरती पार पडली.
यानंतर झालेल्या भव्य महापूजेमध्ये स्वप्निल पवार,सिद्धार्थ जगताप,दत्तात्रय जगताप,विशाल जाधव,यांनी सपत्नीक सहभाग घेतला.

पूजेचे पौरोहित्य अशोकगुरु अग्निहोत्री,रोहित देशपांडे,गुरुप्रसाद दिक्षित,मयूर भंडारी,गुरु विजुगुरु,नंदू भंडारी आणि जितू गुरव यांनी शास्त्रोक्त पद्धतीने केले.
सकाळी ८ ते १० या वेळेत झालेली अभिषेक महाआरती अत्यंत उत्साहात पार पडली.या महा आरतीचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
आरतीचे आयोजन अशोकनाना होळकर,डॉ. कैलास पाटील,डॉ.युवराज पाटील,विष्णू निकम, सुरेश वडनेरे,प्रकाश होळकर (कवी) आणि नानासाहेब पाटील भरत पाटील व शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर “जय हरीविठ्ठल”च्या घोषणांनी गूंजून गेला.
कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.एकंदरीत संपूर्ण उत्सव भक्तिभाव,श्रद्धा आणि पारंपरिकतेने भरलेला होता.



