Breaking
गुन्हेगारी

धाडशी चोरी मुळें कोळगाव मध्ये भिती चे वातावरण निर्माण

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर

1 1 0 1 5 1

न्यायभूमी 

रूई दि.११ मार्च अजिंक्य जगताप रुई

कोळगाव ता निफाड येथील रुई कोळगाव येथील रस्त्यालगत असलेल्या गोरक्षनाथ कृपा बंगला हा श्री जयकुमार घोटेकर याचा आहे गेली चार पाच दिवसांपासून गावी गेले असताना घराला कुलूप होते.

ह्याचा फायदा घेत चोरांनी आपला हात साफ केला घरातील मौल्यवान वस्तू व टिव्ही इतर वस्तूची चोरी झाली आहे.

ह्या धाडशी चोरी मुळें कोळगाव मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे तरी पुढील तपास लासलगाव पोलिस ठाण्यातील हवालदार श्री मुरडनर दादा व नांगरे दादा व पोलीस पाटील श्री अशोक घोटेकर यांनी पाहाणी केली.

तसेच कोळगाव येथील ग्रामस्थांनी सदर गावात रात्री च्या सुमारास गस्त घालावी व पेट्रोलीग वाढवावी तसेच गावातील तरुणांना एक ग्राम सुरक्षा रक्षक दल स्थापन करण्यास परवानगी द्यावी.

एक महीला दक्षता समिती ही स्थापन करावी अशी मागणी सदर अधिकाऱ्यांना केली आहे बिट आमालदार श्री मुरडनर दादा यांनी आपणास सर्वोतरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे