लासलगांव विंचूर रस्त्यावरील अपघातात पुन्हा एकाचा मृत्यू सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १८ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
विंचूर लासलगाव रस्ता हा जणू मृत्यू चां सापळाच बनत चाललेला आहे आजही कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.
जखमींना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लासलगाव – विंचूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विंचुर – लासलगाव रोडवर हॉटेल बळीराजा समोर एक दुचाकी व ह्युडांई वरना गाडीचा अपघात झाला.

सदर अपघातात दुचाकी MH 15HR 4417 वरील चालक मच्छींद्र बाबुराव गांगुर्डे वय – 18 रा कोकणखेडे ता चांदवड हा मयत असुन त्याचे पाठी मागील विजय शिवाजी सोनवणे वय 18 रा कोकणखेडे हा गंभीर जखमी व समोरील
वरना गाडी क्रमांक MH 15 JH 2823 हीचे मालक राहुल बाळासाहेब दरेकर वय 35 रा मरळगोई ता निफाड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. दुचाकीवरील एक जन व कारमधील एक जण असे दोघजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याच रस्त्यावर या पूर्वी अपघात होऊन अनेक लोकांचा जीव गेला आहे.
लासलगाव – विंचूर या रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या मालिका सुरु असल्यानं या रस्त्याचे लवकरच चौपदरी करण व्हावे अशी मागणी करत आहे.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.