लासलगाव येथील छाया ताईंना रक्षाबंधन निमित्ताने तात्काळ नवीन विजजोडणी करून महावितरण ने दिली प्रकाशाची भेट
रक्षाबंधन च्या पूर्व संध्येला घरात लाईट लागल्या नंतर छाया ताईंच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य बघून महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंधुत्व कर्तव्य पार पाडल्याचे मिळाले समाधान
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०९ ऑगस्ट हरिष भागवत
लासलगावातील कचरा डेपो जवळील आदिवासी वस्ती मध्ये राहणाऱ्या श्रीमती छाया अंबादास पवार,ह्यांचे 2 खोल्यांचे पत्राचे घर,ज्यामध्ये त्या आपल्या एक मुलगा आणि सुनबाई सोबत राहतात.
घरामध्ये लाईट नाही,लाईट घ्यायची तर कागदपत्रे स्वतःचे नावाने नाही,आणि लाईट घ्यायला खूप खर्च येतो असा त्यांचा समज,पण किती दिवस अंधारात राहायचे ? म्हणून त्या महावितरण च्या लासलगाव शहर कक्षाच्या कार्यलयात पोहचल्या आणि अभियंता ह्यांच्या पुढे त्यांनी आपली व्यथा मांडत जवळ असलेले आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड कागदपत्रे समोर ठेवली.
अशा परिस्थितीत जागेची मालकी नसताना वीज जोडणी कशी द्यायची म्हणून शहर अभियंता श्री. अजय सावळे ह्यांनी कार्यकारी अभियंता श्री. केशव काळूमाळी साहेब आणि उपकार्यकरी अभियंता श्री.दत्तात्रय पुंडे ह्यांचे मार्गदर्शन घेत, त्याप्रमाणे वीज कर्मचारी श्री विशाल गोरे ह्यांना सांगून,अवघ्या दोन दिवसात स्वतः त्यांचे कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि अवघ्या 620 रुपये इतके त्यांचे कोटेशन भरून घेतले.
विजजोडणी साठी लागणारे सर्व सामग्री घेऊन लासलगाव शहर कक्षातील कर्मचारी वर्ग ह्यांनी रक्षाबंधन च्या पूर्व संध्येला छाया ताई ह्यांच्या घरी तात्काळ विजजोडणी करून प्रकाश करून दिला.

सदर जोडणी करतांना वरिष्ठ तंत्रज्ञ श्री.दीपक जाधव,प्रतीक घुमरे,विशाल गोरे,हरीश भागवत, समाधान साठे,किरण देवरे,शशिकांत जाधव, सुदर्शन शिंदे,लक्ष्मण हिरे,रवींद्र पवार आणि रवींद्र कोळी उपस्थित होते.




