नायलॉन मांजाविरोधात एस.एन.डी.इंग्लिश मिडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेज येथे भव्य शपथविधी; विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा ठाम संकल्प
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
येवला दि.१५ जानेवारी पुष्पा पाटील
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी.इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव येथे नायलॉन मांजा वापराविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नायलॉन मांजामुळे होणारे अपघात,पक्षी व प्राण्यांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेता दिनांक 13 जानेवारी रोजी नायलॉन मांजाविरोधात भव्य जनजागृती व शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री.निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.यावेळी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम, शासनाने घातलेली बंदी तसेच सुरक्षित व पर्यावरणपूरक कागदी मांजाच्या वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन“नायलॉन मांजाचा वापर करणार नाही.
त्याची विक्री व साठवण होऊ देणार नाही,पक्षी व प्राण्यांचे संरक्षण करू आणि समाजात याबाबत जनजागृती करू”अशी शपथ घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांबाबत अनुभव कथन केले तसेच घोषणांच्या माध्यमातून नायलॉन मांजाविरोधात आवाज उठवला.शाळा परिसरात जनजागृती फलक व पोस्टर्सही लावण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून, नायलॉन मांजामुक्त समाज घडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले. यातूनच नायलॉन मांजाचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा सर्वांनी निर्धार केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री.निलेश शिंदे,उपप्राचार्य श्री.संदीप पाटील शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


