0
8
9
9
8
8
न्यायभूमी न्यूज
ओझर: दि.४ वार्ताहर उत्तम गारे
येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली. आपत्ती व्यवस्थापन ओझर विभागाचे क्षेत्ररक्षक रामसिंग बागुल यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार, आग, पूर, विज याविषयावर सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.
यानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर रवींद्र निकम बाळासाहेब मोरे आत्माराम शिंदे महेंद्र डांगळे मनोरमा सोमवंशी शितल हांडोरे आदी उपस्थित होते.
0
8
9
9
8
8