तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जनता विद्यालय वडाळीभोईचा संघ अजिंक्य विद्यालयाची क्रीडा क्षेत्रातील उज्वल यशाची परंपरा कायम
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील

न्यायभूमी
वडाळीभोई दिनांक १२ सप्टेंबर
सहसंपादक सुनील पोळ
येथील मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई तालुका चांदवड येथे बुधवार दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जनता विद्यालय वडाळीभोई येथील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत जिल्हास्तरावरील आपले स्थान निश्चित केले.या स्पर्धेमध्ये तालुक्यातून एकूण 23 संघ सहभागी झालेले होते.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री घनश्याम झुटे व श्री विश्राम मुरकुटे यांचे संस्थेचे सरचिटणीस मा.ॲड.श्री नितीन ठाकरे, संस्थेचे तालुका संचालक मा डॉ.श्री सयाजीराव गायकवाड,शाळेच्या सन्माननीय मुख्यध्यापिका सौ संगीता सोनवणे, मविप्र समाज सोसायटीचे संचालक श्री मंगेश ठाकरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री निवृत्ती घाटे, माध्यमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री सुखदेव जाधव, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री निवृत्ती आहेर, अभिनव बालविकास मंदिरच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री सिताराम जाधव व संपूर्ण शालेय परिवाराने अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.