वनावल येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
शिरपूर दि.११ फेब्रुवारी

साप्ताहिक खान्देशी लिडर वृत्तपत्रामार्फत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीर शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा,वनावल येथे पार पडणार आहे.
या शिबिरात डॉ.इस्माईल हुसेन तसेच डॉ.विरेंद्र गिरासे विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल,धुळे यांच्याकडून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
नेत्र तपासणी,सर्वसाधारण आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन याचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे.
गावातील विद्यार्थी,महिला,ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येत असून आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.