Breaking
महाराष्ट्र

महिला व बालविकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका,मदतनीस यांचा सन्मान 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

नासिक दि ०९ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागा अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

सदरचा कार्यक्रम आज शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कर्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (भा.प्र.से) यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद नाशिक मधील महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केले होते.

यावेळी प्रकल्प संचालक प्रतिमा संगमनेरे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा पडोळ, नाशिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे, सर्व तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकरी, विस्तार अधिकारी आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे