विंचूर येथील क.भा.पा.विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न!
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १४ एप्रिल मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
सिद्धी बंधरे, ईश्वरी जाधव, धनश्री वाळेकर, दिशा धनवटे, स्नेहल सोनवणे ,तनिष्का शिरसाठ ,ज्ञानेश्वरी वेळूकर ,जयेश जेऊघाले ,गौरी चव्हाण ,आनंद उगले, प्रांजल कदम, आयुष वाजे, सिद्धी शर्मा, निखिल पिठे, समृद्धी तिपायले, मेहेक तांबोळी, तेजश्री जेऊघाले ,जान्हवी कुमावत, आरगडे समृद्धी आदिती जेऊघाले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. राजेंद्र टिळेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाविषयी , प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घेतलेले शिक्षण तसेच जातीव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा व त्यांच्या समाज उपयोगी कार्याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना आंबेडकरांचा संदेश शिका, संघटित व्हा व संघर्ष करा याची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली तसेच त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारला पाहिजे असे सांगितले.
सदर कार्यक्रम इयत्ता सहावी ड च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरिता घडवून आणला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे, ज्येष्ठ शिक्षक सदस्य एस एम पवार, अरुण साळुंके, प्रशांत कोळी, संदीप शिंदे,विद्या कुलकर्णी तसेच रमाई गट व त्या गटाच्या सदस्या वत्सलाबाई काळे, सिमा निकाळे, सुनिता साळवे तसेच महिला मंडळ विंचूरच्या सदस्या कविता रणखांबे ,कविता निकाळे, पुष्पा रणखांबे, द्रोपदाबाई, पायल सोनवणे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


