कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा डुबेरे जनता विद्यालय संघ उपविजेता
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर ३० डिसेंबर

मराठा विद्या प्रसारक समाज आयोजित जिल्हास्तरीय कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेमध्ये जनता विद्यालय डुबेरे संघ उपविजेता ठरला. नासिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालय प्रांगणात स्पर्धा संपन्न झाल्या.
संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,संदीप गुळवे,यांच्या उपस्थितीत २१ हजार रुपये पारितोषिक व सन्मान चिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.
पियुष पडवळ,ईश्वर पडवळ,आदेश वाजे,प्रमोद वाजे,आयुष माळी,राहुल गोफणे,सार्थक ढोली, सार्थक वारुंगसे,हर्षद वाजे,राहुल माळी,प्रवीण शिंदे,सार्थक कडभाने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता
अंतिम सामन्यातील बेस्ट रायडर म्हणून डुबेरे जनता विद्यालय संघातील खेळाडू ईश्वर पडवळ याचा गौरव करण्यात आला.अंतिम निर्णयक सामना के टी एच एम महाविद्यालय व जनता विद्यालय डुबेरे यांच्यात खेळला गेला.
विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू व सांघिक भावना विकसित होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले.ग्रामीण भागातील डुबेरे संघाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उपविजेता ठरल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले,क्रीडा शिक्षक शिवाजी गुरुळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे,ज्येष्ठनेते प्रकाशभाऊ वाजे, तालुका संचालक कृष्णाजी भगत शालेय समिती अध्यक्ष नारायण वाजे, विठ्ठल वामणे,सरपंच रामनाथ पावसे,पोलीस पाटील रामदास वारुंगसे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.