गुरुदेव कांदे ला जमीन मंजूर सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
नासिक दि. ११ डिसेंबर मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर
गुरुदेव कांदे याचे विरुद्ध सायखेडा पोलीस स्टेशन येथे पोक्सो व अनुसूचित जाती जमाती कायदा व भारतीय न्याय संहितेचे कालमान्वये पीडित मुलीला गाडीत बसवून तिला तामसवाडी येथे नेऊन तिच्या संमतीशिवाय बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा गुन्हा सायखेडा पोलीस स्टेशन येथे गु.र.न 136/2025 गुन्हा 4-8-2025 रोजी दाखल करण्यात आलेला होता.
त्याचबरोबर सायखेडा पोलीस स्टेशन येथेच 8-8-2025 रोजी दुसऱ्या पीडितेने देखील पोक्सो व अनुसूचित जाती जमाती कायदा व भारतीय न्याय संहितेचे कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता.
त्यामुळे दि 10-11-2025 पासून गुरुदेव द्वारकानाथ कांदे हे न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते. सादर गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर गुरुदेव कांदे यांनी मे.न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सदर जामीन अर्जामध्ये सरकार पक्षामार्फत तसेच पीडिते मार्फत जोरदार विरोध करण्यात आला.
परंतु तापसी अधिकारी यांनी सादर गुन्ह्यात तपासाचे अनुषंगाने जे काही पुरावे हस्तगत केले आहे ते पिडीताने दिलेल्या फिर्यादींबाबत विसंगती निर्माण करणारे असल्याचे आढळून आले.
असा युक्तिवाद कांदे यांच्या वकिलांनी केल्याने सदर गोष्टीची दखल घेत मे.कोर्टाने 9-12-2025 रोजी दोन्ही गुन्ह्यातून गुरुदेव कांदे यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
जामीनासाठी ADV गौरव पोफळीया व ADV राजेश आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले.



