सफेद रंगाचे पट्टे मारले नसल्यामुळे गतिरोधक अपघातांना निमंत्रण
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर दि.२२ नोव्हेंबर
सिन्नर बारागाव पिंपरी शिवरे फाटा मार्गे निफाड या राज्य मार्ग क्रमांक 27 वर या अनेक भागात रस्त्यावरती गतिरोधक टाकण्यात आले आहे.
त्यांच्यावर सफेद रंगाचे पट्टे मारले नसल्यामुळे हे गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहे अपघात रोखण्यासाठी या गतिरोधकांवर तातडीने सफेद पट्टे मारावेत अशी मागणी श्री. दत्तात्रय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) यांनी श्री.सागर बांगरे साहेब (सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता निफाड) यांना निवेदन देत केली आहे.
सिन्नर निफाड क्रमांक 27 वर कानडी मळा, तसेच बारागाव पिंपरी निमगाव,केपानगर ,हिवरगाव,म्हाळसाकोरे,सह अनेक गावांमध्ये गतिरोधक टाकण्यात आले आहे.
वाहनाचा वेग गावाजवळ कमी करण्यासाठी गतिरोधकाची गरज आहे मात्र गतिरोधकावरती सफेद रंगाचे पट्टे न मारल्यामुळे चालकांना न दिसणारे हे गतिरोधक अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे.
या गतिरोधकावर झालेल्या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे काहींना जीवही गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळी वाहने वेगात असल्यामुळे गतिरोधक न दिसल्यामुळे छोटे-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अपघात रोखण्यासाठी गतिरोधकावरती सफेद रंगाचे पट्टे मारून व केटाईस ब्लींकर बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या निवेदनाची प्रत दि.२१.११.२५ मा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नाशिक यांना देण्यात आली आहे.



