न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २८ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे एकूण 44 विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2025 -26 साठी प्रविष्ट झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जवाहर नवोदय विद्यालयासाठी विद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ट होण्याची विद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे.
या परीक्षेत अभिनव नवनाथ खरे हा सन 2025 – 26 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशसाठी पात्र ठरला आहे, या विद्यार्थ्याला विभागप्रमुख पवार ए.एम. बुद्धिमत्ता तसेच विषय शिक्षक सोनावणे जे.बी व भोये आर.आर गणित,निकम के.एम बुद्धिमत्ता,चीतोडकर ए. डी मराठी,शिंदे जे.एस इंग्रजी यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी, त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व विभागप्रमुख यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ ,उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी,विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जगदीश काका जेऊघाले ,अनिल दरेकर, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे,पर्यवेक्षक के.जी.जोपळे, लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



