0
9
5
3
0
3
न्यायभूमी न्यूज
शिर्डी:- दि ०३ फेब्रुवारी विशेष प्रतिनिधी
शिर्डी साईबाबांची दुहेरी हत्याकांडानं हादरली. शिर्डी मध्ये चाललं तरी काय ? विशेष म्हणजे साई संस्थानच्याच दोन कर्मचाऱ्यांची अज्ञातांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ला करून हत्या केली.
सुभाष घोडे,नितीन शेजुळ अशी साई संस्थानच्या मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
या हत्याकांडामागे जे कुणी असतील,त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृत सुभाष घोडेंच्या भावानं केली आहे.
यावेळी सुभाष घोडेंच्या भावंडांना अश्रू अनावर झाले.
अगदी त्यांनी न्यायदानासाठी पोलिसांसमोर ही हात पसरले.
पूढील तपास पोलीस करत आहेत.
0
9
5
3
0
3


