Breaking
आरोग्य व शिक्षण

जनता विद्यालयात राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांना विनम्र अभिवादन

न्यायभूमी सहसंपादक सुनील पोळ 

1 1 9 9 7 6

वडाळीभोई दि.१० ऑगस्ट

 मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बालविकास मंदिर वडाळीभोई येथे शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी जगप्रसिद्ध भारतीय कवी लेखक नाटककार चित्रकार तत्त्वचिंतक व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीम अर्चना जाबरस यांनी थोर शिक्षण तज्ञ रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तर उपस्थित सर्वांनीच प्रतिमेचे पूजन केले.

शालेय विद्यार्थिनी कु स्वरा कहांडळ हिने यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर क्रीडा शिक्षक श्री घनश्याम झुटे यांनीही रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन परिचय देत त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला.

 यावेळी अभिनव बाल विकास मंदिर व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 9 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे