Breaking
आरोग्य व शिक्षण

हिंदी भाषेचे जीवनात अनन्य साधारण महत्व- वाजे

Nyaybhumi news

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि. १५ सप्टेंबर

प्रतिनिधी:- डुबेरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते.      

       व्यासपीठावर जेष्ट शिक्षक दिगंबर जाधव , सोमनाथ गिरी,कचेश्वर शिंदे,सोमनाथ पगार, भारती निखाडे ,सुनील ससाणे , टी. के. बहिरम,अरूण डावरे,रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते.हिंदी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार विद्यालयामार्फत मुख्याध्यापक वाजे यांनी केला. 

  जीवन जगत असतांना अनेकदा व्यवहारात हिंदी भाषेचा वापर करावा लागतो. आपल्या देशात हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.म्हणून हिंदी भाषेचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी केले.

      हिंदी दिनाविषयी उपशिक्षक मारुती डगळे, कल्पना शिंदे,सीमा गोसावी आदी शिक्षकांसह विद्यार्थी प्रणव पावसे,तनुजा निमसे,हरेश वाजे,पल्लवी गवळी,अंकिता ढोली,अनन्या जाधव, कार्तिकी कुंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षरा क्षीरसागर, सायली आव्हाड,शितल वारुंगसे,स्वाती माळी, गायत्री शिंदे,श्रावणी ढोली,अक्षदा जगधने,स्वाती माळी या विद्यार्थ्यांनी हिंदी कविता व गीते सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. प्रास्तविक सांस्कृतिक समिती प्रमुख पी. आर.करपे यांनी केले.सूत्रसंचालन शिवनाथ हुजरे यांनी तर आभार सुषमा थोरात यांनी मानले.

यावेळी डी.ए.रबडे,रेखा खंडीझोड, रेवणनाथ कांगणे,रोहिणी भगत,गायत्री वाजे,राजेंद्र गांगुर्डे,सूरज पगार,सोमनाथ बोडके,सोमनाथ माळी,वृषाली घुमरे , संदीप पानसरे, सुदाम वारुंगसे,सिद्दी आहेर,श्रीमती देवरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे