Breaking
महाराष्ट्र

कोटमगाव येथे महा कुंभातील तीर्थ कलशाचे 11 जोडप्यांच्या हस्ते पूजन व अमृतजलाचे वितरण

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 5

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि २२ मार्च – प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, दि.21/3/2025 रोजी निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे जय श्री.गुरूदत्त मंदिरात अमृत जलाचे पूजन झाले.

प्रयागराज येथे महा कुंभमेळा पार पडला या महाकुंभमेळ्यातील अमृतजलाचे कोटमगाव येथील दत्त मंदिरात 11 जोडप्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

अनुलोम संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गावागावात महा कुंभमेळा संगमावरील तीर्थ पोहोचवले जात आहे. कोटमगाव येथे महा कुंभमेळ्यातील तीर्थ कलश आल्यानंतर श्री गुरुदत्त मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले.

कलश्याच्या स्वागतासाठी महिलांनी गुरुदत्त मंदिरात समोर सडा रांगोळी काढून मंदिराचे फुलांनी सुशोभीकरण केले होते.

हिंदू धर्माच्या रूढी परंपरेनुसार भगवंताचे नामस्मरण करून उपसरपंच श्री. योगेश पवार ह. भ. प श्री बाळासाहेब महाराज शिरसाठ ह .भ .प रसाळ महाराज डॉक्टर गिरीश कुलकर्णी वैद्य बाबा श्री .नामदेव कंक बाबा श्री. विश्वनाथ गांगुर्डे कोटमगाव सोसायटीचे चेअरमन श्री. गणपत मोरे श्री. धनंजय मोरे श्री. विलास शिरसाठ श्री .नाना भालेराव श्री. गणेश बेंडकुळे शुभम शिरसाट तसेच महिला भगिनी अशा विविध जाती धर्मातून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते तीर्थक्षेचे स्वागत करून पूजन झाले.

नंतर जलमृताचे श्री .योगेश रवींद्र कुलकर्णी गुरु यांच्या हस्ते विधी पूजन करून आरती झाली व तीर्थकलशातील जलामृताचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास अनुलोम उपविभाग जनसेवा चे श्री. संतोष चव्हाण सर अनुलोम भाग जनसेवक श्री. मुकुंद अहिरे अनुलोम वस्ती मित्र श्री. गोरक्षनाथ वडनेरे तसेच खडक माळेगाव अनुलोम संस्था वस्ती मित्र श्री .बापू मोरे श्री .कैलास शिरसाठ श्री. ज्ञानेश्वर भवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे