Breaking
महाराष्ट्र

खंडाळा येथे अवकाळी पावसामुळे रात्री घराची भिंत कोसळली

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 5

न्यायभूमी न्यूज 

बुलढाणा जिल्हा दि २५ जुलै 

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात सलग तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे खंडाळा येथे अवकाळी पावसामुळे रात्री घराची भिंत कोसळून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही पण या कुंटुबाची काही किरकोळ संसार भांडी आणि इत्यादी साहित्य उध्वस्त झाले आसल्याची माहिती आहे.

 कुटुंब गार झोपेत असताना रात्री च्या सुमारास ही भिंत कोसळून गेल्याची ही घटना घडल्याची सांगितली जात आहे ही भिंत पाठी मागच्या गल्ली मध्ये कोसळली यात जवळील असलेल्या रहिवाश्यांना देखिल कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे पण ही मातीची भिंत असल्या मुळे जवळ असलेल्या शेजाऱ्यांना जीवित हाणी होण्याचा मोठा अनर्थ टळला 

सलग येणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळून गेली व या घटनेचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबाकडुन होत आहे.

2.3/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे