न्यायभूमी न्यूज
नासिक दि १२ फेब्रुवारी उत्तम गारे
नाशिक जिल्ह्याचा स्काऊट गाईड मेळावा रानवड येथे ६ते९फेब्रुवारी या कालावधीत उत्सहात संपन्न झाला.
दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खाजदार भास्कर भगरे,म.वी.प्र.समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराज काळे,
निफाड शिक्षण संस्थेचे संचालक आर.डी.जाधव,रामराव बनकर, सावरगावचे सरपंच बाबाजी कुशारे, उपसरपंच पोपटराव पाटील,रानवड सोसायटी अध्यक्ष सोपान वाघ,
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय रानवडचे प्राचार्य गोविंद कुशारे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण वाघ आदी मान्यवरांची सांगता सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.
समारोप कार्यक्रमाच्या वेळी स्काऊट व गाईड ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी ठाकरे यांनी केले.स्काऊट व गाईड पथकाने संचालन करत मानवंदना दिली.
खेडेगाव विद्यालयातील गाईड पथकाने बुलेटद्वारे ध्वजवंदना दिली.
गाईड जिल्हा संघटक कविता वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत भारत स्काऊट गाईड चळवळीचा ७५वर्षाचा इतिहास मांडला
स्काऊट गाईड ही संस्कारांची चळवळ असून भावी आयुष्याची पायाभरणी या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन खाजदार भगारे यांनी प्रमुख मार्गदर्शनातून केले.
नाशिक जिल्हा मेळावा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पार पडल्याबद्दल जिल्हा चिटणीस निलेश पाटोळे यांनी गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय मनोगतातून नितीन ठाकरे यांनी विद्यार्थी सुप्त कलागुणांना वाव देणारी स्काऊट व गाईड चळवळ दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत आहेत.
या बद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वाघचौरे, गायकवाड यांनी केले.स्काऊट नाशिक जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना मेळाव्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या बद्दल काकासाहेब नगर विद्यालय आणि शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले.
दि.६फेब्रुवारी २०२४ रोजी काकासाहेब नगर(रानवड) विद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर नोंदणी,तंबू उभारणी,स्काऊट सांस्कृतिक कार्यक्रम पडले.मेळाव्याचे उद्घाटन निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
चार दिवस चाललेल्या या मेळाव्यात विस्तीर्ण खेळ,शारीरिक कसरत, पायोनिरींग,तंबू सजावट,सांस्कृतिक कार्यक्रम,फूड प्लाझा यासारख्या विविध स्पर्धा शहरी आणि ग्रामीण या गटांमध्ये स्काऊट व गाईड यांच्यात घेतल्या.समारोपाच्या वेळी मेळाव्यातील विविध स्पर्धांमध्ये कसब पणाला लावून यश मिळवलेल्या विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत त्यांचा गौरव करण्यात आला.शिंगवे विद्यालयातील स्काऊट व गाईड पथकाने ग्रामीण गटाचे उपविजेतेपद पटकाविले.शहरी गटात स्काऊट विभागात पेठे विद्यालय आणि गाईड विभागात सारडा कन्या विद्यालय हे सर्वसाधारण विजेते पदाचे मानकरी ठरले.
समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी
संजय कुशारे,विलास वाघ
बबनराव कुशारे, किसनराव पाटील,सुरेश वाढवणे,प्रकाश वाढवणे,समीर वाघ,सचिन वाघ,अंबादास पाटील,रमाकांत जाधव,महेश कारे,हरीचंद्र टोपे,प्रवीण वाघ,बद्रीनाथ रायते,अर्जुन टिळे,विलास गोसावी,मनोज कनोजिया,दीपक गायकवाड,दशरथ उगले,सुधीर बनसोडे,सुनील बस्ते,संजय पगार,
सचिन गिते,नितीन दिघे,भगीरथ घोटेकर,संजय आहेर,रेखा निकुंभ,मेघा शेजवळ, संगीता सोनार,
मुक्ता कमानकर आदींसह जिल्ह्यातील हजारो स्काऊट व गाईड विद्यार्थी,शिक्षक,पालक उपस्थित होते.


