Breaking
महाराष्ट्र

मौजे भोईटी,ता.शिरपूर जि.धुळे येथील मणिलाल पाडा अंगणवाडी सेविकाच्या मनमानी कारभार

न्यायभूमी न्यूज

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

धुळे दि ०५ सप्टेंबर प्रतिनिधी राधेशाम पावरा

 

Oplus_131072

 दिनांक ०४/०९/ २०२५ रोजी मा.जिल्हाधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,धुळे. यांना मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रदीप जी पवार सर,व मानव विकास पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी,मौजे भोईटी,ता.शिरपूर जि.धुळे येथील मणिलाल पाडा अंगणवाडी सेविकाच्या मनमानी पध्दतीने कारभार करीत असून, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक दि.२१/०३/२०२४ च्या परिपत्रकाप्रमाणे दैनंदिन कामकाज वेळापत्रकानुसार करीत नसून परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी चार वाजेपर्यंत करणे कायद्याने आवश्यक आहे.

 १:१५ ते २ वाजेपर्यंत अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण टॅकरचा नोंदी अद्यावत करणे वतत्णुर्वी १२:४५ ते १:१५ वाजेपर्यंत लाभार्थ्यांना गरम,ताजा आहार वाटप करणे आवश्यक आहे.

परंतु सदरील अंगणवाडी सेविका लहान बालकांना कुठल्याही परिपत्रक प्रमाणे पोषण आहार वाटप करीत नाहीत.

तसेच मनीलाल पाडा अंतर्गत शासनाच्या स्तनंदा व गर्भधार मातांसाठी अमृत आहार योजनेच्या पुरेपूर आहार देत नाहीत शासनाच्या निधीमध्ये गैरप्रकार करते खोटे रेकॉर्ड तयार गरोदर मातांसाठी येणारा निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून शासनाच्या गोरगरीब शेतमजूर आदिवासी लोकांसाठी येणाऱ्या महिला व बालविकासांच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे.

तसेच आनंगवाडी उघडण्याची निर्धारित वेळ हि. ९.३० ते ९.४५ मिनटात असताना वेळेवर अंगणवाडी उघडत नाही म्हणून मनाव विकास पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मणिलाल पाडा भोईटी येतील रहिवासी यांनी जिल्हाधिकारी धुळे येथे तक्रार दिली यावेळी मानव विकास पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप पवार सर.एम.व्ही.पी.एस.प्रदेशाध्यक्ष वसिम खाटीक जिल्हा अध्यक्ष रोशनसिंग झाल्टे. 

सल्लागार एकनाथ वाघ. जिल्हा सल्लागार अपसर अली सैयद.जिल्हा सचिव.ज्ञानेश्वर पावरा.शिरपूर तालुका उपाध्यक्ष सागर पावरा.दीपक महाले.विलास जाधव.व मणिलाल पाडा.भोईटी येथील ग्रामस्थांच्या सांगण्या वरून तक्रार देण्यात आली.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे