Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथील जगदंबा माता मंदिर वर्धापननिमित्त दुर्गा सप्तशती पाठ

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि २० जून अभय पाटील

भवानी पेठ म्हणजे विंचूर गावातील प्रसिद्ध बाजारपेठ दर आठवड्याचा बाजार या ठिकाणीच भरतो.

याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी ढवण परिवारातल्या पूर्वजानी जगदंबा मातेची स्थापना केली.आणि या ठिकाणी देवीचे मंदिर स्थापन झाल्यामुळे या परिसराला भवानी पेठ नावाने नंतर नावलौकिक मिळाला.

ही मूर्ती अष्टदशभुजा आहे.सन 1983 पर्यंत चैत्र पौर्णिमेमध्ये गावामधून मिरवणूक निघत असे मागच्या वर्षी मूर्ती जिर्णोद्धार,प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा समस्त ढवण परिवार, भवानी पेठ मित्र मंडळ व ग्रामस्थ विंचूर यांच्यावतीने तीन दिवस आयोजित करण्यात आला होता.

आज पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 70 महिलांच्या उपस्थितीत मंदिरा समोर दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यात आले.

त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली व त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे