Breaking
आरोग्य व शिक्षण

विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी

1 2 4 1 5 0

न्यायभूमी 

विंचूर :दिनांक २६ सप्टेंबर २०२६ दत्तात्रय दरेकर 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी निसर्ग लॉन्स, विंचूर येथे जयंती सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर रयत गीत व स्वागतगीत सादर केले.

विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र चांदे यांनी उपस्थितांसमोर कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी आपल्या अहवाल वाचनातून विद्यालयाने क्रीडा, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांत संपादन केलेल्या उल्लेखनीय यशाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.यानंतर विद्यालयातील विद्यार्थी सर्वज्ञ पवार यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याविषयी भाषण केले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांनी रयत शिक्षण संस्थेचा इतिहास व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

 

युवा अनस्टॉपेबल टीम लीडर, नाशिक, विनोद सूर्यवंशी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य तसेच युवा फाउंडेशन विविध विद्यालयांसाठी करीत असलेल्या समाजकार्याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सागर कोते,सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य आणि स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.

      तसेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा ठेव ठेवलेल्या रकमेतून पारितोषिक वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या रयत पर्व या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले,

याप्रसंगी सुनील मालपाणी, सदस्य, उत्तर विभाग सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था, सातारा; सचिन दरेकर, सरपंच, ग्रामपंचायत विंचूर; स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदिश जेऊघाले, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, किरण दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम युवा अनस्टॉपेबल प्रोग्राम मॅनेजर हरीश तुपे,पी. के. जेऊघाले, ज्ञानेश्वर गाडे, दत्तात्रय दरेकर, अशोक दरेकर, राजेंद्र क्षीरसागर, विनायक जेऊघाले, सुमनताई दरेकर, संदीप जोशी, पत्रकार सुनील शिरसागर, रोहन सरोदे, सोनाली कापडणीस, सचिन सालकाडे, योगेश चव्हाण, ढवन सर, कविता मोरे, मालती जाधव, सतीश शेलार, शांताराम दरेकर, मनोज गोराडे, आहेर सर, चव्हाण सर, तेलोरे सर, शेटे सर, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ, पर्यवेक्षक सुदामाळी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विंचूर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा चव्हाण व अश्विनी सावळे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे पर्यवेक्षक जयवंत ठाकरे यांनी मानले.

3.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 4 1 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे